जिल्ह्यात डेंग्यूचे ५९ रुग्ण बरे

By Admin | Updated: November 12, 2014 00:40 IST2014-11-12T00:39:18+5:302014-11-12T00:40:30+5:30

महापालिकेचा दावा : ११ जणांवर उपचार सुरू, ८० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील

5 dengue cases in the district | जिल्ह्यात डेंग्यूचे ५९ रुग्ण बरे

जिल्ह्यात डेंग्यूचे ५९ रुग्ण बरे

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूची साथ आटोक्यात असल्याचा दावा महापालिका व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने केला. एप्रिलपासून आजपर्यंत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, सर्व रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या सीपीआरमध्ये नव्याने डेंग्यूचे ११ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. शहरात सापडलेल्या ४८ रुग्णांपैकी ३५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ६३ प्रभागांत औषध फवारणी पूर्ण केली असल्याची माहिती कीटकनाशक अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
एप्रिल ते आजअखेर ५९ डेंग्यूचे रुग्ण सीपीआरमध्ये दाखल होते. ते सर्व रुग्ण उपचार घेऊन सामान्य जीवन जगत आहेत. नव्याने दाखल झालेल्या ११ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या रुग्णांना तापाची लक्षणे असून, आजार नियंत्रणात असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात सापडलेल्या ४८ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण ठाणे, चंद्रपूर, पुणे, आदी भागातील आहेत...

गवसे येथे डेंग्यूचा रुग्ण
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील शालन श्रीरंग पाटील (वय ४०) या विवाहितेस डेंग्यूची लागण झाली असून, त्याबाबत आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळत आहे. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाकडूनही या वृत्तास दुजोरा मिळत आहे. आजरा शहरातही एका तरुणाला डेंग्यूची लागण झाली असून या तरुणावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

जयसिंगपुरात शाळकरी मुलास डेंग्यू
जयसिंगपूर : शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अभिषेक अनिल ताडे (वय १८, रा. मराठा मंडळ शेजारी, जयसिंगपूर) या शाळकरी विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभिषेकला १५ दिवसांपूर्वी ताप आला होता. तपासणी अहवालात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी शहरातील राजूल बाफना या बालिकेचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. दरम्यान जयसिंगपूर नगरपालिकेमार्फत शहरातस्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे

Web Title: 5 dengue cases in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.