शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्यातील ५ सहकारी साखर कारखाने लिलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 1:54 PM

Sugar factory Kolhapur-

ठळक मुद्दे १६ मार्चला निविदा उघडणार बापरे.. कर्ज थकबाकी ६३२ कोटी

विश्वास पाटीलकोल्हापूर : हंगामभर पुरेल इतक्या उसाची शाश्वती नाही, उसाचे क्षेत्र वाढेल असे प्रयत्न नाहीत, गैरव्यवस्थापन अशा अनेक कारणांनी गेली कित्येक वर्षे तोट्यात असलेले राज्यातील पाच सहकारी साखर कारखाने आणि प्रत्येकी एक सूतगिरणी व दालमिल संस्था राज्य बँकेने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांकडे राज्य बँकेचे तब्बल ७०४ कोटी ५९ लाख रुपये अडकले आहेत. त्यासाठी निविदा मागवल्या असून १६ मार्चला त्याचा निर्णय होणार आहे. पाच कारखान्यांवरील थकीत कर्ज ६३२ कोटी ७७ लाख रुपये आहे.अन्य चार सहकारी साखर कारखाने व एक सूतगिरणी भाडे तत्त्वावर चालवायला देण्यासाठीही निविदा मागवल्या आहेत; परंतु विक्रीस काढलेले कारखाने व अन्य संस्थाही घेणार कोण हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांश कारखाने तरी भंगारात वजनावर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत.

सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनांचे गाळप झाले तरच तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो; परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊसबिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२ चा आहे.

साधारणता १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करेल, अशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ते कर्ज खात्याला जमा करून घेणे एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.

थकीत कर्जाची रक्कम निविदा उघडण्यापूर्वी न भरल्यास जप्त मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली केली जाईल. संपूर्ण कर्ज वसुली न झाल्यास कर्जदार व जामीनदार यांच्याकडून ही वसुली केली जाईल.-डॉ. अजित देशमुखव्यवस्थापकीय संचालकमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई.

विक्रीस काढलेले कारखाने व कर्जाचे ओझे१.जय किसान बोदेगाव (जि.यवतमाळ)-२२२ कोटी२.पांझराकान भाडणे (जि.धुळे) - ८१ कोटी ५५ लाख३.बापूरावजी देशमुख वेळा (जि.वर्धा) - १२९ कोटी २२ लाख (इतर बँका ३३ कोटी)४.जिजामाता दुसरबीड (जि.बुलडाणा)-७९ कोटी५.गंगापूर रघुनाथनगर (जि. औरंगाबाद)-८८ कोटी६.अकोट सूतगिरणी (जि.अकोला)-६७ कोटी २५ लाख७.शेतकरी दालमिल मलकापूर (जि.लातूर)-४ कोटी ५७ लाखभाडे तत्त्वावर देणाऱ्या संस्था१.दत्ताजीराव कदम सूतगिरणी कौलगे (जि.कोल्हापूर)-१० कोटी२.जय जवान साखर नळेगाव (जि.लातूर)-७८ कोटी३.महेश साखर कडा (जि.बीड)-३२ कोटी ७८ लाख

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर