भुदरगड तालुक्यात ४८ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:15+5:302021-07-22T04:17:15+5:30
तालुक्यातील पूर्व भागात गारगोटी- ३१.८ मि. मी., पिंपळगाव -३३.८ मि. मी., कूर - ५८ मि. मी., कडगाव- ८०.५ मि. ...

भुदरगड तालुक्यात ४८ मिमी पावसाची नोंद
तालुक्यातील पूर्व भागात गारगोटी- ३१.८ मि. मी., पिंपळगाव -३३.८ मि. मी., कूर - ५८ मि. मी., कडगाव- ८०.५ मि. मी., करडवाडी- ३६.३ मि. मी. असा आजचा एकूण पाऊस- २४०.४ मि. मी. तर सरासरी पाऊस -४८.१ मि. मी. पाऊस पडला असून आजपर्यंतचा एकूण सरासरी पाऊस - ६९३.३ मि. मी. पाऊस पडला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजे पाटगाव धरण क्षेत्रात ८५ मिमी पावसाची नोंद झाली असून आज अखेर ३०१८ मिमी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वाघापूर आणि निळपण हे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले असून लवकरच इतर बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
पाटगाव जलाशय ७१.६६% भरले असून कोणताही विसर्ग सुरू नाही. आजची पाणी पातळी ६२२.९३ मीटर, एकूण पाणीसाठा ७५.४२ द.ल.घ.मी (२६६३.४५ द.ल.घ.फू.) इतके भरले आहे.