ख्रिश्चन दफनभूमीसाठी ब्रम्हपुरीतील ४८ गुंठे जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:50+5:302021-06-11T04:16:50+5:30

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरीतील ४८ गुुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी ...

48 Gunthas in Bramhapuri for Christian Cemetery | ख्रिश्चन दफनभूमीसाठी ब्रम्हपुरीतील ४८ गुंठे जागा

ख्रिश्चन दफनभूमीसाठी ब्रम्हपुरीतील ४८ गुंठे जागा

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरीतील ४८ गुुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारकडे आणि महापालिकेकडे पाठपुरावा केला. याबद्दल ख्रिश्चन समाजातर्फे क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

अनेक वर्षांपासून ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठीच्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी समाजातर्फे आंदोलनही करण्यात आले होते. यामुळे क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री शिंदे यांनी ब्रम्हपुरीतील ४८ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या. ही जागाही अपुरी पडत असल्यास कदमवाडीत नवीन जागेचा शोध घ्यावा, अशी सूचनाही क्षीरसागर यांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना केली. ख्रिश्चन समाज मंदिरसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी ख्रिश्चन समाज ख्रिस्ती युवा शक्तीचे अध्यक्ष राकेश सावंत, के. पी. सोनवणे, ख्रिस्ती समाज शहर अध्यक्ष रमेश भोसले, अनिल लोखंडे, एलिया भोरे, शामराव सकटे, महेश भालेराव, सनी चिंचणीकर, संदीप आवळे, अरुण सावंत, संजय भोसले, प्रफुल्ल महाजन यांच्यासह ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: 48 Gunthas in Bramhapuri for Christian Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.