शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:47+5:302021-06-19T04:17:47+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे नागरिकांची घरे, जनावराचे गोठे यांची अंशतः पडझड होऊन सुमारे ४७ ...

शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजारांचे नुकसान
मलकापूर :
शाहूवाडी तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे नागरिकांची घरे, जनावराचे गोठे यांची अंशतः पडझड होऊन सुमारे ४७ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली.
गेले दोन दिवस शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. आज १७६ मी.मी पाऊस झाला आहे.
अतिवृष्टीमुळे ओकोली येथील दगडू आंबा लाळे यांच्या राहत्या घरांची भिंत पडून तीस हजार रुपये,शित्तूर तर्फे दारूण पैकी विठ्ठलवाडा येथील गोनू भोरू गळोले यांच्या जनावरांच्या गोठ्याची भिंत पडून सात हजार रूपये,रेठरे येथील तुकाराम आप्पा जंगम यांच्या घराची भिंत पडून दहा हजारांचे तर नेर्ले येथील मारुती मंदिरांची भिंत पडून २०हजार असे ४७ हजार रूपये चे नुकसान झाले आहे.