इचलकरंजीत 47 जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:31+5:302021-05-09T04:25:31+5:30
प्राप्त अहवालात जवाहरनगरमधील 8, शहापूर 5, झेंडा चौक 4, गणेशनगर 3, आर.के.नगर, जुना चंदूर रोड, शिक्षक कॉलनी, सरस्वती मार्केट ...

इचलकरंजीत 47 जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू
प्राप्त अहवालात जवाहरनगरमधील 8, शहापूर 5, झेंडा चौक 4, गणेशनगर 3, आर.के.नगर, जुना चंदूर रोड, शिक्षक कॉलनी, सरस्वती मार्केट येथील प्रत्येकी 2, सुंदर बागेजवळ, निरामय हॉस्पिटलजवळ, वेताळ पेठ, सांगली रोड पाटील मळा, साळुंखे मळा, लालनगर, वखार भाग, केटकाळे गल्ली, संग्राम चौक, मुरदुंडे मळा, अयोध्यानगर, कामगार चाळ, यशवंत कॉलनी, भोने माळ, अशोक सायझिंगजवळ, सर्वोदयनगर, सांगली नाका, सोलगे मळा, तोरणानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत 5 हजार 561 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 4 हजार 717 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 593 जणांवर उपचार सुरू असून, मृतांची संख्या 251 वर पोहोचली आहे.
चौकट
दोन पोलीस पॉझिटिव्ह
वाढत्या कोरोना संसर्गामुळे पोलीस प्रशासनावरही ताण वाढला आहे. बंदोबस्तासाठी पोलीस कायम रस्त्यावर असल्याने पोलिसांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. शनिवारी पोलीस ठाण्यातील 4 अधिकारी आणि 39 पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस ठाणे आणि त्या बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.