इचलकरंजीत ४६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:58+5:302021-07-22T04:16:58+5:30
इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध ३० भागातील ४६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित एकाही ...

इचलकरंजीत ४६ पॉझिटिव्ह
इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध ३० भागातील ४६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये गावभाग ५, जुना चंदूर रोड ४, राजराजेश्वरीनगर ३, सुंदर बाग, नारायण पेठ, बोहरा मार्केट, आसरानगर, भाग्यरेखा टॉकीजजवळ, खंजिरे इस्टेटजवळ, जवाहरनगर, तोरणानगर प्रत्येकी २, जुन्या नगरपालिकेजवळ, मंगळवार पेठ, आवळे गल्ली, प्रेमकला रेसिडेन्सी, गुलमोहर कॉलनी, सांगली रोड, बावणे गल्ली, हत्ती चौक, लिंबू चौक, कलानगर, बंडगर माळ, जिव्हेश्वर मंदिरजवळ, इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, लायकर टॉकीजजवळ, भोनेमाळ, गणेशनगर, कृष्णानगर, शहापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ९०३ जणांना लागण झाली असून, आठ हजार १७७ जण बरे झाले आहेत. ३३७ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३८९ वर स्थिर आहे.