शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Kolhapur: खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन, लाटवडे येथील युवा शेतकऱ्याची किमया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 17:42 IST

आयुब मुल्ला खोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची ...

आयुब मुल्लाखोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची किमया हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील युवा शेतकरी शरद विष्णू पाटील यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री दुरुस्ती करणारा मिस्त्री शेतीचा पोत सुधारून ऊस शेतीला सुध्दा फायद्यात आणण्यात यशस्वी ठरला आहे.शरद पाटील इलेक्ट्रॉनिक्स विषयातून आयटीआय शिक्षण उत्तीर्ण झालेला आहे. टिव्ही दुरुस्त करण्यात त्याचा हातखंडा आहे. हा व्यवसाय करीत त्याने शेतीत उसाचे उत्पन्न अधिकचे घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. खडकाळ जमिनीत विक्रमी उत्पन्न काढण्याचा त्याने चंग बांधला. १५ गुंठयाची जमीन तयार केली. उभी नांगरट केल्यानंतर चार ट्रॉली शेणखत टाकले. त्यांनतर आडवी नांगरट केली. ८६०३२ उसाची दोन डोळे पद्धतीने गेल्या वर्षीच्या जून मध्ये लागण केली. खरीप हंगाम असल्याने त्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग टोकणला. ड्रिप बरोबरच पाट पाण्याची सोय केली. दोन्ही पिके दमदार आली. सहा क्विंटल शेंगा झाल्या.पानांची रुंदी उसाच्या पेऱ्याची जाडी वाढण्यासाठी दोन वेळा फवारणी व आळवणी केली. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेतली. दहा फूट अंतरात सुमारे ५५ ते ६० उसाची संख्या होती. ४५ कांडीचा लांबलचक भरभक्कम तयार झाला. तोडताना त्याचे तीन ते चार कंडके करूनच मोळी बांधावी लागली. ऊस वारणा व शरद कारखान्याला गळीतासाठी पाठविला. त्याचे वजन ४५ टन २४५ किलो झाले. चाळीस हजार रुपयांचा एकूण खर्च वजा जाता १ लाख ४ हजार रुपये व शेंगाचे असे सव्वा लाखाचे उत्पन्न यातून मिळाले. यासाठी सचिन पाटील (भादोले),नितीन देशमुख(कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसFarmerशेतकरी