इचलकरंजीत ४३ पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:03+5:302021-05-05T04:39:03+5:30
इचलकरंजी : शहरात विविध २६ ठिकाणी ४३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच नदीवेस येथील ५३ वर्षीय पुरुष, गोसावी ...

इचलकरंजीत ४३ पॉझिटिव्ह; पाचजणांचा मृत्यू
इचलकरंजी : शहरात विविध २६ ठिकाणी ४३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच नदीवेस येथील ५३ वर्षीय पुरुष, गोसावी गल्लीमधील ७५ वर्षीय महिला, सुतार मळा येथील ८२ व ५५ वर्षीय महिला, तर कृष्णानगर येथील ६२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुरदंडे मळा येथील ७, शहापूर, आमराई रोड, जगताप तालीमजवळ प्रत्येकी ३, कृष्णानगर, सुतार मळा, नदीवेस नाका, काजवे हॉस्पिटलजवळ, आसरानगर प्रत्येकी २, साई मंदिरजवळ, जवाहरनगर, मंगळवार पेठ, इंडस्ट्रियल इस्टेट, वर्धमान चौक, धनगर माळ, जयभीमनगर, सावली सोसायटी, संत मळा, वेताळ पेठ, लायकर टॉकीजजवळ, कारंडे मळा, कलानगर, ठाकरे चौक, गुरू कन्नननगर, नाट्यगृहजवळ व भोनेमाळ येथील प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पाच हजार २८३ जणांना लागण झाली आहे. चार हजार ४३१ जण बरे झाले असून, ६२० जण उपचार घेत आहेत. मृत्यूची संख्या २३२ वर पोहोचली आहे.