नवे ४३ रुग्ण; कोल्हापुरातील २५ रुग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:52+5:302021-03-17T04:25:52+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे २५ रुग्णांचा ...

43 new patients; Including 25 patients from Kolhapur | नवे ४३ रुग्ण; कोल्हापुरातील २५ रुग्णांचा समावेश

नवे ४३ रुग्ण; कोल्हापुरातील २५ रुग्णांचा समावेश

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे २५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

हातकणंगले तालुक्यात दोन, करवीर तालुक्यात पाच, पन्हाळा एक, राधानगरी १, नगरपालिका क्षेत्रात तीन आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले सहा असे रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. दिवसभरात ४०२ जणांची तपासणी करण्यात आली असून, ११३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ११५ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून, ३२१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

चौकट

जिल्ह्यात ११ हजार ४१३ जणांना लस

जिल्ह्यात मंगळवारी एकूण ११ हजार ४१३ जणांना लस देण्यात आली. यामध्ये आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी अशा ३२६ जणांनी, फ्रंटलाइन वर्कर असलेल्या ७६७ जणांनी, ४५ ते ६० वयोगटातील १८८५ जणांनी, तर ६० वर्षांवरील ८४३५ ज्येष्ठ नागरिकांनी मंगळवारी लस घेतली.

Web Title: 43 new patients; Including 25 patients from Kolhapur