‘कोजिमाशि’च्या सभासदांना ४.२८ कोटी लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:36+5:302021-09-26T04:27:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभासदांना २४ प्रमाणे ४ कोटी २८ लाख रुपये लाभांश देणार असल्याची माहिती ...

‘कोजिमाशि’च्या सभासदांना ४.२८ कोटी लाभांश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभासदांना २४ प्रमाणे ४ कोटी २८ लाख रुपये लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळ डेळेकर, उपाध्यक्ष सुभाष पाटील व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी पत्रकातून दिली. आज, रविवारी संस्थेची ऑनलाइन सभा होत आहे.
आर्थिक वर्षात संस्थेने गरुडझेप घेत ४ कोटी २२ लाख ४ ७२ हजार ५८० इतका नफा संस्थेला झाला असून, ऑडिट वर्ग अ कायम राखला आहे. ठेवी ४६६ कोटी ३९ लाख ५३ हजार, तर कर्जवाटप ३९० कोटी ४१ लाख ३४ हजार केले आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात संस्थेने २ कोटी ८० लाख २३ हजार ४४७ इतके कर्ज कर्जमुक्ती निधीतून मयत सभासदांचे कर्ज माफ केले, असे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड सांगितले.
कोविड महामारीच्या काळात २८५ सभासदांना १४ लाख २५ हजार, पूरग्रस्त शाळा व सभासदांना १३ लाख २ हजार मदत दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीकडे २ लाख ५० हजार रुपये दिले असून, महापूर व कोविडमध्ये सभासदांना आर्थिक मदत करणारी कोजिमाशि ही महाराष्ट्रातील एकमेव वित्तीय संस्था असल्याचे डेळेकर व लाड यांनी पत्रकात म्हटले आहे.