शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन महिन्यांत ४२ गावांना महानगर प्राधिकरणाचा दर्जा, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:37 IST

आमदार चंद्रदीप नरके यांनी वेधले लक्ष

कोल्हापूर : पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या धर्तीवर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देऊन ४२ गावांचा विकास साधण्याच्या मागणीचा विचार करून पुढील दोन महिन्यांत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली.कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण नगररचनाच्या कलम ४२ अन्वये स्थापन झाले आहे. कलम ४२ अन्वये स्थापन झालेल्या प्राधिकरणाने विकास परवानगीतून निधी मिळवावा आणि तो विकास कामांवर खर्च करावा, असा नियम आहे. त्यामुळे या प्राधिकरणाला राज्य सरकारचा निधी उपलब्ध होत नाही याकडे लक्ष वेधण्याकरिता आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा उपस्थित केली.नरके यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा अडचणी सभागृहात मांडल्या. गेल्या आठ वर्षांत विकास परवानगी देऊन १२ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. परंतु एवढ्याशा उत्पन्नात प्राधिकरणातील ४२ गावांचा विकास होऊ शकत नाही. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने व कामाचा निपटारा वेळेत होत नसल्याने यापूर्वी अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शासकीय जमिनींचा उपयोग करू ..मूलभूत सुविधांसह शिक्षण, क्रीडांगण, घनकचरा, रस्ते व सांडपाणी व्यवस्थापन याकरिता नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याकरिता शासकीय जमिनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांमध्ये शासकीय जमिनी उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे प्राधिकरणास मूलभूत सुविधा व उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याबाबतची बाब तपासण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

लोकमतच्या बातमीची दखल..प्राधिकरण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक मशीन, हालचाल रजिस्टर, अभ्यागतांची नोंदवही तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय वेळ पाळण्याबाबत लेखी सक्त सूचना देण्यात आल्या असून गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. लोकमतने या कार्यालयाचे स्टिंग ऑपरेशन करून कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याचे उघडकीस आणले होते. त्याची दखल विधानसभेत घेतली गेली.

यापूर्वीचा अनुभव वाईटआताचे प्राधिकरण स्थापन करताना तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही असेच आश्वासन दिले होते. हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण स्थापन करून या गावांचा सूत्रबद्ध विकास करू, लागेल तेवढा निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले होते, परंतु दुर्दैवाने त्यातील पुढे काहीच घडले नाही.