शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २०२९ ला विधानसभेचे ४०० आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:47 IST

१३३ महिलांना संधी मिळणार

कोल्हापूर : महाराष्ट्रात २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ४०० मतदारसंघ असतील. शिवाय विधानसभेत महिला आमदारांचाही टक्का वाढणार आहे असून, विधानसभेत १३३ महिला आमदार दिसतील, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.भाजपतर्फे रविवारी येथे ‘संविधान गौरव अभियान’ आयोजित केले होते. त्या वेळी त्यांनी ही शक्यता वर्तवली. यावेळी राज्यघटनेच्या अनुषंगाने बोलताना पाटील यांनी कॉंग्रेसवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्तित्व ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणांना भाजपने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. त्यांचे लंडनमधील घर विकत घेऊन त्याचे स्मारक केले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घटना बदलावरून नागरिकांची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसचा हा फसवा प्रचार विधानसभेच्या निवडणुकीत उघडा पडला. काँग्रेसने घटनेत दुरुस्ती करताना सर्वाधिकार केंद्राकडे घेतले होते. तर पंतप्रधान मोदी यांना आर्थिकदृष्टया मागास घटकांना दहा टक्के आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केली.या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमित गोरखे, आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, राहुल चिकोडे, डॉ. संजय एस. पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, रूपाराणी निकम, विजय भोजे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलvidhan sabhaविधानसभाWomenमहिला