शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मराठी सिनेसृष्टीला 400 काेटींचा फटका, आता ‘बिगिन अगेन’चे वेध, कोरोनामुळे अडकले ३० ते ३५ चित्रपट

By संदीप आडनाईक | Updated: November 4, 2020 06:30 IST

Marathi cinema : मराठीत वर्षाला १५० चित्रपट तयार होतात.  त्यातीलही फक्त आठ ते दहाच सुपरहिट होतात तर ९० ते १४० चित्रपट तोट्यात जातात.

-   संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोरोना साथीच्या फटक्यातून मराठी चित्रपट उद्योगही सुटलेला नाही. मराठी चित्रपट उद्योगाचे जवळपास ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. चित्रीकरण, प्रदर्शन रखडल्याने काही मोजके कलाकार सोडले तर अनेकांना पैशाची चणचण जाणवत आहे. कलाकार व तंत्रज्ञांचीही उपासमार होत आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला ‘बिगिन अगेन’चे वेध लागले आहे.मराठीत वर्षाला १५० चित्रपट तयार होतात.  त्यातीलही फक्त आठ ते दहाच सुपरहिट होतात तर ९० ते १४० चित्रपट तोट्यात जातात. ‘झी सिनेमा’चा ‘पांडुरंग’, प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, दिग्पाल लांजेकरचा ‘जंग जौहर’ या चित्रपटांसह २५ ते ३० छोट्या चित्रपटांचे चित्रीकरण कसेबसे सुरू आहे.  प्रकाश वैद्य यांच्या ‘छू मंतर’ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ‘एबी आणि सीडी’,  ‘विजेता’,  ‘इभ्रत’ हे तीन प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटगृहे बंद झाली. महेश मांजरेकर यांचा ‘पांघरूण’, ‘वायकॉम-१८’चा ‘मी वसंतराव देशपांडे’, ‘दे धक्का-२’, ‘मीडियम स्पायसी’, ‘बस्ता’, ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’, ‘दगडी चाळ-२’, ‘अजिंक्य’, ‘ईमेल-फीमेल’, ‘येरे येरे पावसा’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘नेबरहुड’, ‘झॉलीवूड’, ‘वाजवूया बँडबाजा’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.

- चित्रपटगृहे सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हाेत आहे.

चित्रपट महामंडळाने सहकार्य करून सरकारकडून काही रक्कम या वर्गाला मिळवून द्यावी.- नीतिन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स असोसिएशन 

हिंदीप्रमाणे मराठीत काॅर्पोरेट कंपन्या नसल्यामुळे मराठी चित्रपटांचे भवितव्य अंधारात आहे.- समीर दीक्षित, चित्रपट उद्योग अभ्यासक 

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमाkolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस