शाहूवाडीत कोरोनाचे नवीन ४० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:11+5:302021-05-05T04:41:11+5:30
शाहूवाडीत कोरोनाचे नवीन ४० रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील सतरा गावांत नवीन कोरोना पॉझिटिव्ह ४० रुग्ण ...

शाहूवाडीत कोरोनाचे नवीन ४० रुग्ण
शाहूवाडीत कोरोनाचे नवीन ४० रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील सतरा गावांत नवीन कोरोना पॉझिटिव्ह ४० रुग्ण आढळून आले आहेत, तर एका वयोवृद्धाचा मुत्यू झाला आहे.
तालुक्यातील कैर्लेपैकी बोरमाळ धनगरवाडा, ओकोली, सरुड, शित्तूर तर्फ मलकापूर, टेकोली, बांबवडे, चरण, माणगाव, करंजोशी, कोतोली, शाहूवाडी, शिराळे तर्फ मलकापूर, पाटणे, डोणोली, भेडसगाव, कोळेगाव, कापशी, आदी गावांत कोरोनाचे ४० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. करंजोशी येथे एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने तालुक्यात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ७६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.