चंदगड नगरपंचायतीला अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:55+5:302021-05-12T04:23:55+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नाने चंदगड नगरपंचायतीला अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाख रुपये अनुदान मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष ...

चंदगड नगरपंचायतीला अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाखांचा निधी मंजूर
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नाने चंदगड नगरपंचायतीला अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाख रुपये अनुदान मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष प्राची काणेकर यांनी दिली. चंदगड शहरात अग्निशमनवाहिकेची नितांत गरज आहे. नगराध्यक्षा काणेकर यांनी याकरिता पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे अनुदानाची मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हा नियोजन वार्षिक योजनेत ४० लाखांची तरतूद करण्यात आली. ३१ मार्च २०२२ पर्यंत हा खर्च करणे नगरपंचायतीला बंधनकारक आहे. चंदगड नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहिकेसाठी ४० लाखांचे अनुदान मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांनी चंदगड नगरपंचायतीला पाठवले आहे.
चंदगडच्या शिवछत्रपती स्मारकासाठीही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी २० लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात ६० लाखांची नवी कामे मंजूर झाली आहेत.
------------------------
* प्राची काणेकर : ११०५२०२१-गड-०१