वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीसाठी सीपीआरला ४० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:03+5:302021-05-07T04:26:03+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी आ. चंद्रकांत जाधव यांनी मदत केली आहे. त्यांनी ...

40 lakh to CPR for purchase of medical equipment | वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीसाठी सीपीआरला ४० लाखांचा निधी

वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीसाठी सीपीआरला ४० लाखांचा निधी

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी आ. चंद्रकांत जाधव यांनी मदत केली आहे. त्यांनी त्यांच्या निधीतून ४० लाख रुपयांचा निधी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) दिला. राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सीपीआरसाठी आ. जाधव यांच्याकडे एनआयव्ही बीआय पॅप मशीन, मल्टी पॅरा मॉनिटर्स (फाइव्ह पॅरा), व्हिडिओ लॅरिनोस्कोप, व्हेंटिलेटर सर्किट व बनीस सर्किट, आदी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या खरेदीसाठी आ. जाधव यांनी त्यांच्या निधीतून ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी सीपीआरला दिला.

Web Title: 40 lakh to CPR for purchase of medical equipment