शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात घोटवडेजवळ अपघातात ४ कामगार तरुण ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:03 IST

गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे कामगारांना घेवून जाणाऱ्या क्रुझर जीप आणि डंपरची कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात चालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर बाराजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही दूर्देवी घटना घडली. कर्त्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने जिल्हा शोकसागरात बुडाला.

ठळक मुद्देक्रुझरजीप आणि डंपरची धडक : कामावर जात असताना काळाचा घालामृत कसबा तारळे, पिरळ, सोन्याची शिरोली येथील

कोल्हापूर/भोगावती : गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे कामगारांना घेवून जाणाऱ्या क्रुझर जीप आणि डंपरची कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात चालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर बाराजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही दूर्देवी घटना घडली. कर्त्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने जिल्हा शोकसागरात बुडाला.चालक साताप्पा बळवंत गुरव (वय ३०, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी), प्रकाश मारुती एकावटे (४८, रा. पिरळ, ता. राधानगरी), ऋषीकेश राजेंद्र पाटील (२३), कृष्णात दिनकर गुरव (२३, दोघे रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळावरील दृष्य अंगावर शहारे आनणारे होते. चालक गुरव याचा मृतदेह ओढून बाहेर काढला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. डंपरचालक भितीने पसार झाला. या अपघातामुळे सकाळपासून तीन तास कोल्हापूर-राधानगरी आणि तेथून कोकणात जाणारी वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूकीची कोंडी झाली. राधानगरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली.प्रवासी जीप (एम. एच. ०९ ईयू-४७४४) बुधवारी पहाटे साडेसहाला राधानगरीहून गोकुळशिरगाव एमआयडीसीकडे येत होती. जीपमध्ये १६ कामगार होते. घोटवडे फाटा स्वयंभू मंदिरानजीक येताच समोरुन डंपरची (एम. एच. ०९ ई. एम. ४५८४) धडक झाली. यावेळी मोठा आवाज होऊन क्रझरजीपचा चक्काचूर झाला. कामगार चिरडले गेले, तर एकमेकांच्या अंगावर, काहीजण दहा ते पंधरा फूट उडून बाजूला पडले. कुणाच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांचा आक्रोशाने कोणालाच काय करावे ते सुचत नव्हते.

भेदरलेल्या जखमींचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेत तातडीने इस्पुली, राशिवडे, राधानगरी येथील १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. जखमी कामगार पिरळ, शिरोली, तारळे, कुडूत्री, आणाजे, आवळी परिसरातील असल्याने येथील नातेवाईक व मित्रांनी अपघातस्थळासह सीपीआरकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सीपीआर आणि खासगी रुग्णालयात भेट देवून अपघाताची माहिती घेत जखमींची विचारपूस केली.जखमी नावे अशी,रामचंद्र गणपती पेंडे (वय ३० रा. पिरळपैकी दुबलवाडी), रंगराव दत्तात्रय चौगुले (४०), सूरज गणपती पाटील (३५), अमोल सुरेश आसवेकर (२१, तिघे, रा. पिरळ), उत्तम दिनकर तिबिले (३५), संदीप गणपती पाटील (२७), संदीप दत्तात्रय हुजरे (३०, तिघे रा. आणाजे), राहुल सुरेश पाटील (२४), अमित कुंडलीक चौगुले (२७, दोघे, रा. आवळी ब्रुद्रक), साताप्पा श्रीपती चौगुले (३०), सागर आनंदा पाटील (२७ दोघे, रा. कुडूत्री), अनिल मधुकर चौगुले (२५, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी). 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर