आॅनलाईनमुळे चार कोटी महसूल

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:29+5:302015-07-25T01:13:30+5:30

महावितरण : रांगेत राहून बिल भरण्यापेक्षा आॅनलाईनकडेच अधिक कल

4 million revenue due to online landline | आॅनलाईनमुळे चार कोटी महसूल

आॅनलाईनमुळे चार कोटी महसूल

रत्नागिरी : रांगेत राहून वीजबिल भरण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटव्दारे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे तसेच विविध शहरात किंवा परदेशात स्थायिक आहेत. अशा मंंडळींना दरमहा वीजबिल भरण्यासाठी कोणावर अवलंबून न राहता, घरबसल्या वीजबिल भरणे शक्य होत आहे. मे व जूनमध्ये जिल्ह्यातील २७ हजार ७३६ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ४ कोटी ३५ लाख ८ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ग्राहक ४ लाख १६ हजार ८८६, वाणिज्यिक ग्राहक ३१ हजार ४२३, औद्योगिक ग्राहक ५५४७, कृषिपंप १५ हजार ५५२, सार्वजनिक पाणीपुरवठा २२६०, पथदीप १३५५, तर इतर ३२४९ ग्राहक आहेत. महावितरणने ग्राहकांना आॅनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे महावितरणच्या संकेतस्थळावरून ग्राहक नंबर घालून आॅनलाईन वीजबिल पाहणे सुकर झाले आहे. अनेक ग्राहक आॅनलाईन वीजबिल पाहून त्याची प्रिंट काढून इंटरनेटव्दारे भरत आहेत. दिवसेंदिवस आॅनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये एकूण १३ हजार ४२३ ग्राहकांनी वीजबिल आॅनलाईन पध्दतीने भरल्यामुळे २ कोटी ७ लाख ४४ हजार १९० रूपयांचा महसूल जमा केला आहे. जूनमध्ये ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. १४ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे २ कोटी २७ लाख ६३ हजार ८१० रुपयांचा महसूल जमा केला आहे. मे व जून महिन्यात चिपळूण विभागातील एकूण ८००५ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ६३ लाख ५ हजार ६९५ रूपयांचा महसूल जमा केला आहे. खेड विभागातील एकूण ४ हजार ७४३ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे एक कोटी ५१ लाख ४ हजार ९६५ रूपये, तर रत्नागिरी विभागातून १४ हजार ९८८ ग्राहकांनी २ कोटी २३ लाख ५७ हजार ३४० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. आॅनलाईन वीजबिल भरण्याच्या सुविधेचा चिपळूण विभागातील शहरी भागामध्ये एकूण ३२४१ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ५३ लाख ३९ हजार ३४० रूपयांचा महसूल जमा केला आहे. याच विभागातील गुहागरमधून २७३६ ग्राहकांनी २१ लाख ३ हजार २२० रूपये, तर रत्नागिरी विभागातील शहरी भागातील ५४६८ ग्राहकांमुळे १ कोटी ५ लाख ६२ हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.


मे महिनाजून महिना
विभागग्राहकउत्पन्न ग्राहकउत्पन्न
चिपळूण४०२८५२२७५६५३९७७५४०८१३०
खेड२२८६४९६७४२५२४५७५५४७५४०
रत्नागिरी७१०९१०५४९२००७८७९११८०८१४०
एकूण१३४२३२०७४४१९०१४३१३२२७६३८१०


आॅनलाईन वीजबिल सुविधेचा फायदा ग्राहकांना होतोय.
जिल्हाभरातील ग्राहकांकडून महसूल जमा.
महावितरणचा हा प्रयोग लाभदायी ठरल्याचा दावा.
महसुलात वाढ.

Web Title: 4 million revenue due to online landline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.