गडहिंग्लजच्या झेप अॅकॅडमीला ४ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:39 IST2020-12-12T04:39:23+5:302020-12-12T04:39:23+5:30
ग्रामीण होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सुरू केलेल्या झेप अॅकॅडमीला भूलतज्ज्ञ डॉ. संजय चौगुले यांनी आपली आई काशिबाई ...

गडहिंग्लजच्या झेप अॅकॅडमीला ४ लाखांची मदत
ग्रामीण होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सुरू केलेल्या झेप अॅकॅडमीला भूलतज्ज्ञ डॉ. संजय चौगुले यांनी आपली आई काशिबाई सिद्धाप्पा चौगुले यांच्या नावाने २ लाखांची, तर वीरशैव बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवंगत सुभाष तोरगल्ली यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी उमा तोरगल्ली यांनी २ लाखांची देणगी दिली.
ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी ‘‘झेप’’चे कार्याध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सचिव संदीप कागवाडे, खजिनदार महेश मजती, सूरज तोरगल्ली, प्राचार्या मीना रिंगणे, डॉ. संजय चौगुले, रशिदा शेख, आदी उपस्थित होते.
-
----
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे एम. एल. चौगुले यांच्याकडे उमा तोरगल्ली व काशिबाई चौगुले यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सूरज तोरगल्ली, डॉ. संजय चौगुले, दत्ता पाटील, बी. एस. पाटील, संदीप कागवाडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १११२२०२०-गड-०३