इचलकरंजीत ३७ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST2021-06-16T04:32:12+5:302021-06-16T04:32:12+5:30

इचलकरंजी : शहरात विविध २६ भागातील ३७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ...

37 positive in Ichalkaranji; Death of one | इचलकरंजीत ३७ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजीत ३७ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात विविध २६ भागातील ३७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सातपुते गल्ली ४, गावभाग महादेव मंदिरजवळ, इंदिरा हाऊसिंग सोसायटी प्रत्येकी ३, स्वामी मळा, आसरानगर, विक्रमनगर, लिंबू चौक, दातार मळा प्रत्येकी २, चांदणी चौक, टिळक रोड, गांधी कॅम्प, सहकारनगर, थोरात चौक, आंबेडकर पुतळ्याजवळ, कागवाडे मळा, नाईक मळा, बंडगर मळा, रेणुकानगर, मॉडर्न हायस्कूलजवळ, कोरवी गल्ली, जवाहरनगर, गणेशनगर, कृष्णानगर, दत्तनगर, धनगर मळा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सात हजार ४५० जणांना लागण झाली असून, सहा हजार ६९३ जण बरे झाले आहेत. ३९० जणांवर उपचार सुरू असून, ३६७ वर मृत्यूसंख्या पोहचली आहे.

Web Title: 37 positive in Ichalkaranji; Death of one