आजरा अर्बन बँकेसाठी ३६ टक्के मतदान
By Admin | Updated: June 13, 2015 00:14 IST2015-06-13T00:01:14+5:302015-06-13T00:14:31+5:30
. १३ जागांसाठी एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २३,२४९ मतदारांपैकी ८३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

आजरा अर्बन बँकेसाठी ३६ टक्के मतदान
आजरा : दि आजरा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता ३४ केंद्रांवर सरासरी ३६ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील मुख्यालयावर प्राधान्याने सत्तारूढसह विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत होते. आजरा येथे चार केंद्रांवर सरासरी ५९ टक्के मतदान झाले. इतर उर्वरित केंद्रांवर मात्र मतदानामध्ये सभासदांत फारसा उत्साह दिसला नाही.मुंबई, कोपरखैराणे, मालवण येथे सभासदांचा मतदानास अत्यल्प प्रतिसाद लाभला. आजरा येथे मात्र सत्तारूढ आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली होती. अशोकअण्णा चराटी, विलास नाईक, प्रकाश वाटवे यांच्यासह डॉ. सोमशेट्टी स्वत: मतदानाच्या ठिकाणी उपस्थित होते.मतदारांना आणण्यासाठी चारचाकी वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला होता. पावसाने उघडीप दिल्याने आजरा येथील चार केंद्रांवर जोरदार चुरस दिसत होती. मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्या, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमण मळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. १३ जागांसाठी एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २३,२४९ मतदारांपैकी ८३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादिवशीचे एकंदर चित्र पाहता निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)