पन्हाळा न्यायालयात लोकआदलती ३५६ खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:49+5:302021-09-26T04:27:49+5:30
पन्हाळा : पन्हाळा न्यायालयात लोकअदालतीत तब्बल ३५६ खटले निकाली निघत ९२,५४,३२२ रुपये वसूल झालेत. ...

पन्हाळा न्यायालयात लोकआदलती ३५६ खटले निकाली
पन्हाळा : पन्हाळा न्यायालयात लोकअदालतीत तब्बल ३५६ खटले निकाली निघत ९२,५४,३२२ रुपये वसूल झालेत. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), राज्य विधि सेवा प्राधिकरण(मुंबई), कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार पन्हाळा न्यायालयातील तालुका विधि सेवा समितीमार्फत शनिवारी पन्हाळा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यात तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणामध्ये फौजदारी खटले १६८ निकाली निघाले, तर ग्रामपंचायत कोडोली व कोतोलीमधील थकीत घरफाळा व अन्य रकमेचे २८७ खटले निकाली निघून ३० लाख रुपये वसूल झाले. बँक ऑफ इंडिया व युनियन बँक यांची ३० प्रकरणे निकालात निघून ३४, ६१७००/- ही रक्कम वसूल झाली. एकूण १८९५ खटले तडजोडीसाठी ठेवले गेले पैकी ३५६ खटले निकाली काढण्यात आले. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश ऋतेष मावतवाल यांनी ही माहिती दिली.