शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लग्नाच्या स्वागत समारंभात ३५ तोळे दागिन्यांवर डल्ला, कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: December 19, 2023 15:54 IST

कोल्हापूर : शिरोली जकात नाक्यावरील ए.एस. लॉनमध्ये लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांचे ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने. मोबाइल आणि आठ ...

कोल्हापूर : शिरोली जकात नाक्यावरील ए.एस. लॉनमध्ये लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांचे ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने. मोबाइल आणि आठ हजार रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्याने लंपास केली. हा प्रकार सोमवारी (दि. १८) रात्री दहाच्या सुमारास घडला. याबाबत केतन वीरेंद्र नंदेशवन (वय ३६, रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केतन नंदेशवन यांच्या मामेभावाच्या लग्नाचा स्वागत समारंभ सोमवारी रात्री शिरोली जकात नाक्यावरील ए.एस. लॉनमध्ये होता. त्यासाठी नंदेशवन कुटुंबीय लॉनमध्ये आले होते. केतन यांच्या आईकडे दागिन्यांची बॅग होती. त्या पायात बॅग ठेवून खुर्चीत बसल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास त्यांची नजर चुकवून एका तरुणाने बॅग लंपास केली.काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच नंदेशवन कुटुंबीयांनी बॅगचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर स्वागत समारंभाचे चित्रीकरण करणारे कॅमेरे तपासले असता, एका चोरट्याने बॅग लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्या बॅगेत ३५ तोळे दागिने, आठ हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाइल असा सुमारे १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच केतन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या दागिन्यांची झाली चोरीसाडेसात तोळ्यांचा सोन्याचा पेंडल हार, पाच तोळ्यांचा कोयरी हार, तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, सहा तोळ्यांच्या बांगड्या, पाच तोळ्यांचे सोन्याचे तोडे, पाच तोळ्यांचे बाजूबंध, दीड तोळ्याची कर्णफुले, आठ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, एक तोळे सोन्याची चेन बॅगेत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस