पन्हाळा तालुुक्यात कोरोनाचे ३४८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:14+5:302021-05-19T04:24:14+5:30
पन्हाळा तालुक्यात सध्या ३४८ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्यावतीने संजीवन सोमवारपेठ व पोर्ले येथील शाळेत व्यवस्था केली असून ...

पन्हाळा तालुुक्यात कोरोनाचे ३४८ रुग्ण
पन्हाळा तालुक्यात सध्या ३४८ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्यावतीने संजीवन सोमवारपेठ व पोर्ले येथील शाळेत व्यवस्था केली असून पोर्ले येथे २० ऑक्सिजन बेड तर संजीवन येथे १० ऑक्सिजन बेड आहेत. सध्या या दोन ठिकाणी अनुक्रमे संजीवन सोमवारपेठ येथे ९४ व पोर्ले येथे ३८ रुग्ण आहेत. तालुक्यात केवळ दोनच ठिकाणी खासगी दवाखान्यात कोविडचे रुग्ण दाखल करून घेतात. यात संजीवन बोरपाडळे येथे ११ व यशवंत आयुर्वेदिय दवाखाना कोडोलीमध्ये ५ रुग्ण आहेत. या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णांसाठीच औषधोपचार खर्च घेतले जातात. या खर्चाची तपासणी उपविभागीय अधिकारी पन्हाळामार्फत होऊनच रुग्णांना झालेल्या खर्चाचा तपशील दिला जातो. तालुक्यात सध्या माले, पन्हाळा, जोतिबा, शहापूर व आंबवडे या ठिकाणी ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या अधिकारात रुग्ण ठेवल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल कवठेकर यांनी सांगितले.