शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पावसाच्या तांडवामुळे विजेची ३४० रोहित्रे बंद; नऊ हजार २०० ग्राहकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:15 IST

मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला.

ठळक मुद्देपावसाच्या तांडवामुळे विजेची ३४० रोहित्रे बंदनऊ हजार २०० ग्राहकांना बसला फटका

कोल्हापूर : मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला.ढगफुटीसारख्या पावसाने मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत विजांच्या लखलखाटासह अक्षरश: झोडपून काढले. तुफानी पाऊस, साचत चाललेले पाणी आणि विजांमुळे दक्षता म्हणून महावितरणने सबस्टेशनवरील वीज काही काळासाठी खंडित केली होती. पावसाचा जोर ओसल्यानंतर ती पूर्ववत सुरू केली. पाण्यामुळे बिघाड झालेली रोहित्रे बुधवारी सकाळी तातडीने दुरुस्तीस घेतली. ९४ गावे व परिसरातील वीज पूर्णपणे खंडित झाली होती. ती बुधवारी दुपारपर्यंत पूर्ववत झाली.

कडाडणाऱ्या विजा आणि पाण्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सबस्टेशन बंद ठेवण्याची आम्ही दक्षता घेतली. त्यामुळे महावितरणचे फारसे नुकसान झाले नाही. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करता आला.- प्रशांत मासाळ, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर परिमंडल

आपत्ती व्यवस्थापन कार्यालयावरच आपत्तीजिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन हाताळणारे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयही रात्रभर अंधारात होते. दुपारी बाराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाली. आपत्ती कार्यालयातील सर्व यंत्रणा बंद असल्याने पावसाचा अहवालही दुपारनंतरच प्रसिद्धीस देण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूरRainपाऊस