कोरोनाचे नवे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:25+5:302021-03-07T04:22:25+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत आहे. शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३४ रुग्ण सापडले ...

34 new corona patients; Death of one | कोरोनाचे नवे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू

कोरोनाचे नवे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत आहे. शनिवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३४ रुग्ण सापडले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील ३४ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील २० रुग्णांचा समावेश आहे. गडहिंग्लज ४, हातकणंगले ३, कागल १ आणि करवीर तालुक्यातील ३ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे, तर अन्य जिल्ह्यातील तीन रुग्ण सापडले आहेत.

दिवसभरामध्ये २९८ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ८७५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. १५९ जणांची अन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे, तर सध्या ३७२ जणांवर उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील आवळी येथील ४६ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

चौकट

४७ जणांना डिस्चार्ज

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या अधिक आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये ४७ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे.

Web Title: 34 new corona patients; Death of one