जिल्ह्यात ३३ अनधिकृत शाळा
By Admin | Updated: June 9, 2016 01:22 IST2016-06-09T00:23:22+5:302016-06-09T01:22:21+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : कारवाईचा इशारा, प्रवेश न घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात ३३ अनधिकृत शाळा
कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३३ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. या शाळांची यादी शिक्षण प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे या शाळांत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाच्या निकषानुसार प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काहीजणांनी परवानगी न घेताच शाळा चालू ठेवल्या आहेत. त्या अनधिकृत शाळा अशा : गीताई इंग्लिश मीडियम स्कूल, सातवे (ता. पन्हाळा), शामराव दाभाडे मराठी आश्रमशाळा शाहूवाडी, कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, फुलेवाडी (कोल्हापूर शहर), ज्ञानहो विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, नाना पाटीलनगर (कोल्हापूर), आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर (कोल्हापूर), चाटे इंग्लिश मीडियम स्कूल, शुगर मिल, कसबा बावडा (कोल्हापूर), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, कसबा बावडा (कोल्हापूर), सिद्धेश्वर प्रासादिक मराठी माध्यम विद्यालय, कोल्हापूर, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी पेठ (कोल्हापूर), कोल्हापूर इंग्लिश मीडियम स्कूल, खरी कॉर्नर, (कोल्हापूर), राणेज प्रायमरी मराठी शाळा, राजारामपुरी (कोल्हापूर), लिटल वंडर्स प्ले ग्रुप आणि संजीवन प्रायमरी इंग्रजी स्कूल, साळोखेनगर (कोल्हापूर), द्रोणागिरी इंग्लिश मीडियम स्कूल, शहाजी वसाहत (कोल्हापूर), निसर्ग निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, रंकाळा (कोल्हापूर), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, चोकाक (ता. हातकणंगले), स्वामी विवेकानंद सेमी इंग्रजी विद्यालय, तळंदगे (ता. हातकणंगले), सिल्म इंग्रजी मीडियम स्कूल, हुपरी (ता. हातकणंगले), यश सेमी इंग्रजी स्कूल, वडगाव (ता. हातकणंगले),
श्री. पंडितराव खोपकर इंग्रजी मीडियम स्कूल, सावरवाडी (ता. करवीर), श्री मोरजाई शिक्षण संस्था सेमी इंग्लिश स्कूल, कोपार्डे (ता. करवीर), विद्याभवन इंग्रजी मीडियम स्कूल, उजळाईवाडी (ता. करवीर), ज्ञानकला इंग्रजी मीडियम स्कूल, उचगाव (ता. करवीर), पाषाण मराठी शाळा, शिये (ता. करवीर), पाषाण मराठी शाळा, हलसवडे (ता. करवीर), बी. एस. टोपणी मराठी विद्यालय, हलकर्णी (ता. गडहिंग्लज), हिरण्यकेशी इंग्लिश मीडियम स्कूल, नूल (ता. गडहिंग्लज), बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल, गडहिंग्लज, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, गडहिंग्लज, संतुलन पाषाण मराठी शाळा, नांदणी (ता. शिरोळ), जान्हवी इंग्रजी मीडियम स्कूल, गणेशवाडी (ता. शिरोळ), फाऊंडेशन इंग्रजी मीडियम स्कूल, कवठेगुलंद (ता. शिरोळ)