इचलकरंजीत ३३ पॉझिटिव्ह ; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST2021-05-15T04:24:13+5:302021-05-15T04:24:13+5:30

इचलकरंजी : येथे विविध २० भागांतील ३३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच पुजारी मळा येथील ७० वर्षीय वृद्धा, ...

33 positive in Ichalkaranji; Death of three | इचलकरंजीत ३३ पॉझिटिव्ह ; तिघांचा मृत्यू

इचलकरंजीत ३३ पॉझिटिव्ह ; तिघांचा मृत्यू

इचलकरंजी : येथे विविध २० भागांतील ३३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच पुजारी मळा येथील ७० वर्षीय वृद्धा, शहापूर परिसरातील ५५ वर्षीय व जयभीमनगर परिसरातील ५० वर्षीय पुरुष अशा तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये जवाहरनगर ५, गावभाग ४, उत्तम-प्रकाश चित्रमंदिरजवळ, सांगली नाका परिसर प्रत्येकी ३, शहापूर, सोलगे मळा प्रत्येकी २, धान्य ओळ, विकली मार्केट, वृंदावन कॉलनी, येलाज मळा, रामनगर, विक्रमनगर, गणेशनगर, लिंबू चौक, कागवाडे मळा, षटकोन चौक, लिगाडे मळा, राजराजेश्वरीनगर, लालनगर, कापड मार्केट परिसरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पाच हजार ९२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार ९५ बरे झाले आहेत. ५५२ रुग्णांवर उपचार सुरू असून, आजअखेर २७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 33 positive in Ichalkaranji; Death of three