कोरोनाचे जिल्ह्यात नवे ३३ रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:32 IST2021-02-27T04:32:39+5:302021-02-27T04:32:39+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाच्या नवीन ३३ रुग्णांची भर पडली, तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी १९ ...

33 new patients die in Corona district | कोरोनाचे जिल्ह्यात नवे ३३ रुग्ण, दोघांचा मृत्यू

कोरोनाचे जिल्ह्यात नवे ३३ रुग्ण, दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाच्या नवीन ३३ रुग्णांची भर पडली, तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी १९ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

शुक्रवारी आढळून आलेल्या नवीन ३३ कोरोना रुग्णांमध्ये १९ कोल्हापूर शहरातील, पाच गडहिंग्लज तालुक्यातील, तीन आजरा तालुक्यातील, दोन हातकणंगले तालुक्यातील, तर एक करवीर तालुक्यातील आहे. कोल्हापूर शहरातील बिंदू चौक परिसरातील ७५ वर्षीय पुरुष, तर टिंबर मार्केट येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या ७७३ चाचण्या झाल्या, त्यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ११२ व्यक्तींची अँटिजेन चाचणी करण्यात आली, त्यापैकी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालय व प्रयोगशाळेत ३२८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.

Web Title: 33 new patients die in Corona district