युवा स्पोर्टस् गारगोटीचा ३२ वा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:11+5:302021-01-23T04:25:11+5:30

गारगोटी : युवा स्पोर्टस्, गारगोटी मंडळाचा ३२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार ...

32nd Anniversary of Youth Sports Pebble | युवा स्पोर्टस् गारगोटीचा ३२ वा वर्धापन दिन

युवा स्पोर्टस् गारगोटीचा ३२ वा वर्धापन दिन

गारगोटी : युवा स्पोर्टस्, गारगोटी मंडळाचा ३२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी गारगोटी येथील जेष्ठ नागरिक बी एस माने यांच्या हस्ते मंडळाच्या मुख्य शाखेच्या फलकास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. १९८८ मध्ये या मंडळाची सुरुवात करण्यात आली. गणेश उत्सवाकरिता सुरू केलेल्या मंडळाने गेली ३२ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठे काम केले आहे. मंडळाने अल्पावधीत राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांमध्ये आपल्या शाखांचा विस्तार केलेला आहे. यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर, बाजीराव चव्हाण, बी.एस.माने, मिलिंद पांगीरेकर, दत्तात्रय परीट, रफीक बागवान, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, रणधीर शिंदे, अजित चौगले, दीपक खोत, युवराज नाईक, मंडळाचे सदस्य तानाजी आबिटकर, महेश सुतार, चिदंबर कलकुटकी, यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत भोई यांनी केले तर आभार अल्ताफ बागवान यांनी मानले.

फोटो : वर्धापन दिनास उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, बी.एस.माने, बाजीराव चव्हाण, मिलिंद पांगीरेकर, सर्जेराव मोरे, अजित चौगले, दीपक खोत आदी.

Web Title: 32nd Anniversary of Youth Sports Pebble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.