जिल्ह्यातील ३१८ गुन्हेगार उत्सवकाळात हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:39+5:302021-09-12T04:28:39+5:30

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३१८ गुन्हेगारांना उत्सव कालावधीत दहा दिवसांसाठी जिल्ह्यातून ...

318 criminals deported in the district during the festival | जिल्ह्यातील ३१८ गुन्हेगार उत्सवकाळात हद्दपार

जिल्ह्यातील ३१८ गुन्हेगार उत्सवकाळात हद्दपार

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३१८ गुन्हेगारांना उत्सव कालावधीत दहा दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी समाजात संभाव्य गुन्हेगारीचा धोका विचारात घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांबाबत माहिती संकलित करून त्यांना उत्सव कालावधीत हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यातील अशा सुमारे ३१८ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली. त्यामध्ये करवीर पोलीस ठाण्यामार्फत मोहित मोतीलाल मिरेकर (रा. रेणुकानगर, पाचगाव), अभिजित शिवाजी पौडकर (पौडकर गल्ली, पाचगाव), पांडुरंग बापू शेळके (रा. बोंद्रेनगर) या तीन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली.

जिल्ह्यातील हद्दपार गुन्हेगार

कोल्हापूर शहर : ८९

इचलकरंजी शहर : ८४

जयसिंगपूर-शिरोळ : ६४

इतर : ८१

Web Title: 318 criminals deported in the district during the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.