शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तिघा कोल्हापूर पोलिसांसह ३१ जणांवर गुन्हा तरुणास मारहाण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:06 IST

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर दोन गटांतील वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी ठाण्याच्या तिघा पोलिसांसह ३१ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संजय जाधवसह दोन गणवेशातील पोलिसांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याच्यावरही बेकायदेशीर ...

ठळक मुद्देबेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी तरुणावरही गुन्हा

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर दोन गटांतील वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी ठाण्याच्या तिघा पोलिसांसह ३१ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संजय जाधवसह दोन गणवेशातील पोलिसांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याच्यावरही बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत माहिती अशी, स्टेशन रोडवर रविवारी रात्री मद्यधुंद पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मार्शल गर्दे जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. यावेळी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी जमावाची समजूत घालत सोमवारी पहाटे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. घटनास्थळावरील पोलिसांनी मद्य प्राशन केले होते काय, याची तपासणी करण्यासाठी सहायक फौजदार संदीप जाधवसह अन्य दोन पोलिसांचे रक्ताचे नमुने सीपीआर रुग्णालयात घेतले. त्यामध्ये दारूचा अंश आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्णाचा तपास शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे करत आहेत.जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय २७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर उभा असताना अनोळखी कारमधून आलेल्या संजय जाधव व त्यांच्या सहकाºयांनी फायबरच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दाभोळकर कॉर्नर चौक येथे फरफटत नेत गणवेशातील पोलिसांनी छातीवर काठीने मारहाण केली.शाहूपुरीचे सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधव (४३, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकात कार्यरत आहे. रविवारी रात्री हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना मित्र माजी हॉकीपटू दया पाटील हे मित्रांसोबत स्टेशन रोडवरील अनुग्रह हॉटेल येथे जेवणाकरिता आले होते.मी त्यांना भेटण्यासाठी गेलो असता, हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर तरुणांचे दोन गट लाकडी काठ्या व दगड घेऊन हाणामारी करत होते. त्यांना हटकण्यासाठी पुढे गेलो असता संशयित मार्शल गर्दे याने मला धक्काबुक्की करून हातावर काठी मारली. मित्र दया पाटील याच्या डोक्यात मारहाण करून जखम केली. त्यानंतर मी पोलीस ठाण्यास फोन करून मदतीसाठी पोलीस मागवून घेतले.संशयितांना चालत पोलीस ठाण्याकडे घेऊन येत असताना काँग्रेस भवनजवळ आलो असता गर्दे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालत गर्दे याला जबरदस्तीने घेऊन गेले. त्यानुसार संशयित गर्दे याच्यासह पंचवीसजणांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.घटनास्थळावरील चर्चा वेगळीचमार्शल गर्दे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो काही मित्रांसोबत स्टेशन रोडवर आला होता. याठिकाणी त्याची माजी हॉकीपटू दया पाटील व त्यांच्या सहकाºयांसोबत बाचाबाची झाली. एकमेकाला शिवीगाळ झाल्याने पाटील यांनी मित्र सहायक फौजदार संदीप जाधव यांना बोलावून घेतले. जाधव यांनी गर्देला जाब विचारत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनीही हात उगारले. यावेळी गर्दे व त्याच्या मित्रांनीही जोरदार हाणामारी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगड, विटांचा वापर करण्यात आला. सहायक फौजदार जाधव यांनी मदतीला रात्रड्युटीवर असलेल्या पोलिसांना बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी येऊन गर्देला बेदम मारहाण केल्याची घटनास्थळावर चर्चा आहे.स्टेशन रोडवर घडलेल्या मारहाणीची माहिती घेतली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना यासंबंधी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. संबंधित पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस