शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महाप्रसादातून शिवनाकवाडीत ७०० जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:22 IST

गणपती कोळी  कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ ) येथे यात्रेतील महाप्रसादातून आज, बुधवारी सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा ...

गणपती कोळी कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे यात्रेतील महाप्रसादातून आज, बुधवारी सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली. गंभीर रुग्णांवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आरोग्य विभागाने महाप्रसादातील पदार्थ व पाणी तपासण्यासाठी पाठविले असून रुग्णांना तातडीचे उपचार करण्यासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक आरोग्य  कर्मचारी, अधिकारी सेवा देत आहेत. उपचारासाठी रुग्णांसह नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.गावचे ग्रामदैवत कल्याणताई देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने काल, मंगळवारी दुपारी खिरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. मात्र मध्यरात्रीनंतर काही नागरीकांना उलटी, जुलाबाचा त्रास होत असल्याने प्रारंभी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत होते. मात्र ही संख्या वाढत असल्याने विषबाधा झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. विषबाधाची घटना समजताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रीय करुन रुग्णावर उपचार सुरु केले. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात येत होते. तसेच आरोग्य विभागाचे तीन पथके घरोघरी जाऊन विषबाधेतील रुग्णांची माहिती घेत होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी खटावकर उपचाराबाबत नियोजन करत होते. दुपारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी रुग्णांची भेट घेतली. तसेच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, तहसीलदार अनिल हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जि.प. माजी सदस्य विजय भोजे, पृथ्वीराज यादव यांच्यासह राजकीय नेत्यांनी भेट देवून रुग्णांसह नातेवाईकांना धीर देत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshirol-acशिरोळfood poisoningअन्नातून विषबाधा