आज रेमडेसिविरची ३०० इंजक्शन येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:53+5:302021-04-16T04:25:53+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील रेमडेसिविरची टंचाई शुक्रवारी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ...

आज रेमडेसिविरची ३०० इंजक्शन येण्याची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यातील रेमडेसिविरची टंचाई शुक्रवारी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत असून, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संपर्क साधल्यानंतर काही कंपन्यांनी ही इंजेक्शन्स कोल्हापूरसाठी पाठवल्याचे सांगण्यात आले. ३०० इंजेक्शन्स कुरिअरद्वारे पाठविण्यात आली असून, ती शुक्रवारी दुपारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दिवसभरामध्ये १३२ इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. रेमडेसिविरसाठी आरोग्य विभागापासून ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण परिश्रम घेत आहेत.
चौकट
गरजूंना बेळगावचा आधार
कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिविरची टंचाई असताना गरजूंनी बेळगावमधून इंजेक्शन उपलब्ध करून घेतली आहेत. चढ्या दराने का असेना तेथून इंजेक्शन मिळत असल्याने गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांनी बेळगावचा आधार घेतला आहे. मात्र, ही इंजेक्शन देताना डॉक्टरांचे प्रिस्किप्शन सक्तीचे केले असताना काही डॉक्टर ते लिहून देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही चित्र आहे.
चौकट
रुग्णालये शिल्लक बेड
आयसीयू बेड ऑक्सिजन बेड ऑक्सिजनविरहित बेड व्हेन्टी. बेड एकूण बेड
८२ १८२ ६६२ १,२२० ३४ २,०९८