शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:09 IST

बांबवड्याच्या दोघांचे कायमस्वरूपी ऐकणे झाले बंद

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दणदणटामुळे कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ३० हून अधिक तरुणांचे कान बाद झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दोघांना ऐकू येणे कायमस्वरूपी बंद झाले आहे. आता याबाबत सर्व डॉक्टरांकडून माहिती संकलित करण्याचा निर्णय कान, नाक, घसातज्ज्ञांच्या संघटनेने घेतला आहे.विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा हा आता चिंतेचा विषय झाला आहे. लेझरमुळे काही जणांच्या डोळ्यांतून रक्त आल्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर बंदी आणली होती; परंतु रात्री १२ ला जरी ध्वनी यंत्रणा बंद झाली असली तरी त्याआधी तरुण मंडळांनी एकावर एक थर चढवत आपली आवाजाची हौस भागवून घेतील होती; परंतु यामध्ये अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचेच कान बाद झाले आहेत.

बांबवडेजवळील पाटणे येथील एक युवक कानाला ऐकू येईनासे झाल्यानंतर १२ तासांत डॉक्टरांकडे आला. त्याच्या पडद्याला इंजेक्शन देण्यात आले आणि त्यातून त्याला ५० टक्के ऐकू येऊ लागले; परंतु दुसरा इंजिनिअर असलेला २१ वर्षांचा युवक दोन दिवसांनी डॉक्टरांकडे आला. त्यामुळे उपचारावर मर्यादा आल्याने त्याला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. तो ध्वनी यंत्रणेला पाठ लावून बसला होता. बांबवडे येथील तिसऱ्या युवकाची ऐकण्याची क्षमता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.अधिक माहिती घेतली असता कोल्हापूरमधील एका कानाच्या डॉक्टरकडे हे दहाजण दाखल झाले होते. असे ३५ जण शहरात असून आता त्यांच्याकडून कोणाच्या दवाखान्यात कितीजण दाखल झाले होते, याची माहिती घेतली जात आहे. संघटनेने हा उपक्रम हातात घेतला असून, त्या आकडेवारीच्या आधारे जनजागरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. राजश्री माने आणि डाॅ. अजित लोकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संख्याही अधिकमोठी ध्वनी यंत्रणा केवळ शहरात लावली जाते हा गैरसमज आहे. दाखल १० रुग्णांपैकी सातजण हे ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये वाघापूर (ता. भुदरगड), हासूर दुमाला (ता. करवीर), कळे सातवे (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, अयोध्या कॉलनी येथील युवकांचा एक कान बरा असून, दुसऱ्या कानाची ऐकण्याची क्षमता ५० टक्क्यांहून कमी झाली आहे.

नेहमीपेक्षा कानावर मोठा आवाज आणि तो अधिक काळ आदळला तर त्यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होते. संबंधित व्यक्ती जर २४ तासांत डॉक्टरकडे आली तर इंजेक्शन देऊन उपचार करता येतात. २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला तर मात्र उपचारावर मर्यादा येतात. माझ्याकडे आलेले बहुसंख्य रुग्ण मिरवणूक झाल्यानंतर तीन, चार दिवसांनी आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना मर्यादा आल्या आहेत. - डॉ. वासंती पाटील, कर्ण उपचार तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४doctorडॉक्टर