शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

कोल्हापूर जिल्ह्यातील ३० हजार शेतकरी पेन्शनपासून वंचित राहणार

By राजाराम लोंढे | Updated: February 5, 2024 13:42 IST

केंद्राच्या ‘पी. एम. किसान’, राज्याच्या ‘नमो’ पेन्शनही मुकणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या पीएम किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ४११ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्तता केली आहे. उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी. एम. किसान सन्मान योजना सुरू केली. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्यांत दिले जाते. जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्यात पेन्शन मिळत होती. पण, यामध्ये निकषाला फाटा देऊन अनेकजण लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची लाभार्थ्यांची तपासणी झाली, यामध्ये हजारो लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. यामध्ये लाख ९२ हजार ७१० शेतकरी पात्र ठरले.त्यानंतर, सबंधितांची केवायसी पूर्तता करण्याची मोहीम केंद्र सरकारने हातात घेतली. गेली दीड वर्ष शासनाने या मोहिमेला मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ४११ जणांनी केवायसी पूर्तता केली आहे. अद्याप ३० हजार २९९ शेतकऱ्यांनी ई केवायसीची पूर्तता केलेली नाही.या शेतकऱ्यांना केंद्राच्या पेन्शनबरोबरच राज्य सरकारच्या ‘नमो’ पेन्शनपासून वंचित रहावे लागणार आहे.

शिरोळ, चंदगड, कागलात चांगले कामई केवायसी, आधार लिंकचे काम शिरोळ, चंदगड, कागल, गगनबावडा तालुक्यात चांगले झाले आहे. तुलनेत आजरा, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

तालुकानिहाय ई केवायसी प्रलंबित शेतकरी

तालुका एकूण शेतकरी प्रलंबित
आजरा३० हजार ७३६ २ हजार ९८३
भुदरगड३२ हजार ५६९ १३ हजार ८७७
चंदगड४० हजार ९५१ २ हजार ७०६
गडहिंग्लज ४९ हजार ९२८ ४ हजार ४७६
गगनबावडा ६ हजार ८५९   १७७
हातकणंगले५२ हजार ३१९ ४ हजार ५३३
कागल४७ हजार ५९९ १ हजार ३५
करवीर६२ हजार ८९९  ३ हजार १०१
पन्हाळा४९ हजार ९६२    ५ हजार १४३
राधानगरी४० हजार १००  १ हजार २३७
शाहूवाडी३४ हजार ३९३३ हजार ३२१
शिरोळ४४ हजार ३९५ २००

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPensionनिवृत्ती वेतन