राधानगरी तालुक्यात ३० पोलीस पाटीलपदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:04+5:302021-07-12T04:16:04+5:30
तालुक्यातील काळम्मावाडी धरण बुडीत क्षेत्रातील वाडदे,वाकी,बांबर्डे,कोनोली तर्फ ऐनघोल,आसनगाव,भांडणे,नानीवळे, कांबर्डे या आठ गावांचा त्यामध्ये समावेश असून ...

राधानगरी तालुक्यात ३० पोलीस पाटीलपदे रिक्त
तालुक्यातील काळम्मावाडी धरण बुडीत क्षेत्रातील वाडदे,वाकी,बांबर्डे,कोनोली तर्फ ऐनघोल,आसनगाव,भांडणे,नानीवळे, कांबर्डे या आठ गावांचा त्यामध्ये समावेश असून ती गावे शासनाने अद्याप वगळलेली नसून येथील आठ पोलीस पाटील पदे कागदावर आहेत.
बुडीत क्षेत्रातील गावे वगळता ११३ महसूल गावे असून प्रत्यक्षात ९१ गावांमध्ये पोलीस पाटील कार्यरत आहेत. त्यामध्ये विशेषतः राशिवडे बुद्रूक,कसबा वाळवे, तारळे खुर्द, मजरे कासारवाडा, अर्जुनवाडा, सोन्याची शिरोली, आकनूर,चंद्रे व सुळंबी आदी मोठ्या गावांसह २२ गावचे पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. सध्या काही पोलीस पाटलांना दोन-दोन गावांचा कारभार पहावा लागत आहे. तेव्हा शासनाने ज्या गावचे पोलीस पाटील पद रिक्त आहे तेथील पोलीस पाटील रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी आहे.