विकासकामांसाठी ३० कोटींचा निधी देणार : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:43+5:302021-01-03T04:26:43+5:30
कोल्हापूर : माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ...

विकासकामांसाठी ३० कोटींचा निधी देणार : पालकमंत्री
कोल्हापूर : माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या वर्षभरात ४७ कोटींचा निधी शहरातील विकासकामांसाठी दिला असून, ३१ मार्चपर्यंत आणखी ३० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
प्रभागातील हायमास्ट, रस्ते विकास, गटर, चॅनेल बांधकाम तसेच वॉटर एटीएमचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. बिंदू चौकसमोरील महात गल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जयेश कदम, संजय मोहिते, डॉ. बुलबुले, आश्कीन आजरेकर, आश्पाक आजरेकर उपस्थित होते.
सर्व मिळकतधारकांना येत्या वर्षभरात त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शहरातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार जाधव व आमदार पाटील यांनी दिली. माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रभागातील सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रभागात गेल्या पाच वर्षात सात कोटींची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो क्रमांक ०२०१२०२१-कोल-आजरेकर
ओळ - कोल्हापुरातील महात गल्ली येथे विविध विकासकामांचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होत्या. छाया : नसीर अत्तार