कोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 01:05 PM2020-09-29T13:05:10+5:302020-09-29T13:06:28+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क, नो एन्ट्रीची मोहीम महापालिका प्रशासनाने गतीमान केली असून शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ३ लाख ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली.

3 lakh fine collected from those who do not wear masks in Kolhapur city | कोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देकोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ३ लाखांचा दंड वसूलथुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून व्यापक मोहीम

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क, नो एन्ट्रीची मोहीम महापालिका प्रशासनाने गतीमान केली असून शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली आहे. गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ३ लाख ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली.

आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले, कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.रस्त्यावर विशेषता सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहनही आयुक्त डॉ. कलशेटटी यांनी केले आहे.

तारीख                  वसूल रक्कम

  • २१ सप्टेंबर           42800
  • २२ सप्टेंबर           28800
  • 23 सप्टेंबर           53200
  • 24 सप्टेंबर           47900
  • 25 सप्टेंबर           40200
  • 26 सप्टेंबर           39300
  • 27 सप्टेंबर           54900

Web Title: 3 lakh fine collected from those who do not wear masks in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.