शाहूवाडीत २९ गावात एक गाव एक गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST2021-09-15T04:27:49+5:302021-09-15T04:27:49+5:30

मलकापूर : महापुरांचे संकट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील १३१ महसुली गावापैकी २९ गावा मध्ये ‘एक गाव एक गणपती’ ...

In 29 villages in Shahuwadi, one village is one Ganpati | शाहूवाडीत २९ गावात एक गाव एक गणपती

शाहूवाडीत २९ गावात एक गाव एक गणपती

मलकापूर : महापुरांचे संकट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील १३१ महसुली गावापैकी २९ गावा मध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रबविली आहे. गेल्या वर्षी २१ गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवत तालुका प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला.

तालुक्यातील पोलीस यंत्रणेने एक गाव एक गणपतीचे प्रबोधनात्मक आवाहन केले होते. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गणरायाचे आगमन, पूजा-अर्चा-देखावे, विसर्जन मिरवणुका गर्दी टाळूनच करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. साउंड सिस्टिम, झगमगाट, विद्युत रोषणाई यासारख्या भपकेपणाला फाटा देऊन गणेशोत्सव साजरा होत आहे. एक गाव एक गणपती साकारणाऱ्या प्रमुख गावांची नावे पेरीड, विशाळगड, ससेगाव, आंबा, मानोली, घोळसवडे, ओकोली, कोपार्डे, पळसवडे, मालेवाडी. सांबू, केर्ले, तळवडे, बर्की, टेकोली, परिवणे, शेंबवणे, मोसम, परळे, शाहूवाडी, कुंभवडे कातळेवाडी, परळे.

Web Title: In 29 villages in Shahuwadi, one village is one Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.