नवे २९ मृत्यू, रुग्णसंख्या कमी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:08+5:302021-06-30T04:17:08+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने ...

29 new deaths, no decrease in the number of patients | नवे २९ मृत्यू, रुग्णसंख्या कमी येईना

नवे २९ मृत्यू, रुग्णसंख्या कमी येईना

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना चाचण्या जास्त होत आहेत, म्हणून पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु गेले दोन महिने सुरू असलेेले मृत्यू रोखण्यात मात्र आरोग्य विभागाला अपयश आले आहे. २५ पासून ३५ पर्यंत रोज मृतांचे आकडे येत असून हा आकडा कसा रोखणार हाच खरा प्रश्न आहे.

मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १४२६ रुग्ण नोंदवण्यात आले असून, १०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १२ हजार ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. पावणेदहा हजारांवर आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा १२ हजारांवर गेली आहे. शहरातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावार मृत्युसंख्या

कोल्हापूर शहर ०९

राजारामपुरी, शिवाजी पेठ ०२, कसबा बावडा, कॉमर्स कॉलेजसमोर, सरनाईक कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर शहर

हातकणंगले ०४

रुई, कुंभोज, हिंगणगाव, पट्टणकोडोली

पन्हाळा ०३

जेऊर, पाटपन्हाळा, करडवाडी

करवीर ०२

दऱ्याचे वडगाव, आमशी दुमाला

शाहूवाडी ०२

शिंपे, बांबवडे

चंदगड ०१

तावरेवाडी

आजरा ०१

वाटंगी

भुदरगड ०१

मिणचे खुर्द

कागल ०१

राधानगरी ०१

कंदलगाव

शिरोळ ०१

टाकवडे

इतर जिल्हे ०३

हुक्केरी, हल्याळ, कुर्ली

Web Title: 29 new deaths, no decrease in the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.