२९ नव्या बसेसना कात्री ? के.एम.टी. प्रशासन अनभिज्ञ

By Admin | Updated: September 25, 2015 00:32 IST2015-09-25T00:29:53+5:302015-09-25T00:32:02+5:30

केंद्र सरकारच्या ज्या योजनेतून या बसेस मंजूर झाल्या आहेत, ती योजनाच केंद्र सरकारने बंद केली आहे

29 New Buses Scissors? K.M.T. Admin unaware | २९ नव्या बसेसना कात्री ? के.एम.टी. प्रशासन अनभिज्ञ

२९ नव्या बसेसना कात्री ? के.एम.टी. प्रशासन अनभिज्ञ

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे घेण्यात येणाऱ्या १०४ बसेस पैकी २९ बसेसना कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारच्या ज्या योजनेतून या बसेस मंजूर झाल्या आहेत, ती योजनाच केंद्र सरकारने बंद केली आहे; परंतु याबाबत के.एम.टी. प्रशासन यासंदर्भात अनभिज्ञ असल्याची बाब गुरुवारी समोर आली.गुरुवारच्या सभेत राजेश लाटकर यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करून कॉँग्रेस सरकारच्या काळात शरद पवार यांच्या पुढाकाराने के.एम.टी.ला १०४ बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यातील २९ बसेसचा निधी रद्द झाल्याची माहिती आहे, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. के.एम.टी.चे प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले की, केंद्राच्या ‘जेएनएनयुआरएम’ योजनेतून ७५ आणि २९ (कंडिशनल) अशा बसेस मंजूर झाल्या. ज्या योजनेतून या बसेस मंजूर झाल्या आहेत ती योजनाच भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने रद्द केली आहे. ७५ बसेसचा निम्मा हप्ता प्राप्तही झाला आहे. त्यामुळे ज्यांना पहिला हप्ता मिळाला त्यांना दुसरा हप्ता मिळण्यात अडचण येणार नाही, परंतु २९ बसेसचा एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्याचे काय होणार हे माहीत नाही. सर्व बसेसची वर्क आॅर्डर देण्यात आली असून, त्यापैकी ५० बसेस आल्या आहेत. त्यांचा खुलासा पटला नाही.

Web Title: 29 New Buses Scissors? K.M.T. Admin unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.