शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यामध्ये कोल्हापूर सीपीआरमध्ये २८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:25 IST

याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देगंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.

कोल्हापूर : सीपीआरमध्ये कोरोना संशयित रुग्णांची तपासणी सुरू झाल्यापासून कोरोना व्यतिरिक्त २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूमोनिया, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अर्धांगवायू, निकामी झालेले फुप्फुस आदी कारणांनी हे मृत्यू झाले आहेत. दक्षता म्हणून यातील २७ जणांच्या घशातील स्राव घेण्यात आले होते. मात्र, ते देखील निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.सीपीआरमध्ये ११ मार्चपासून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी आणि त्यांच्या घशातील स्राव घेण्याचे काम सुरू करण्यात आले. काही कालावधीनंतरकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आणि सीपीआर हे कोरोना विशेष उपचार रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.याउलट अनेक खासगी रुग्णालयांनी गंभीर झालेले रुग्ण कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे पाठवायला सुरुवात केली. हृदयविकारापासून अर्धांगवायू झालेले रुग्णही कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे रात्री अपरात्री पाठविले जाऊ लागले. तसेच याच दरम्यान काही खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी पैशाचीही मागणी केली. परिणामी, असे रुग्ण सीपीआरकडे येऊ लागले.त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना हा निर्णय बदलून पुन्हा सीपीआरमध्ये रुग्णांची सोय करणे भाग पडले. त्यामुळे अगदी परवापर्यंत अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना सीपीआरकडे पाठवून देण्याची पद्धत पडली आहे. कोणत्याही प्रकारचा रुग्ण समोर आल्यानंतर शासकीय दवाखाना रुग्णाला नाकारू शकत नसल्याने सीपीआरच्या वैद्यकीय पथकांनीही आता प्रसूती, बालरोग विभाग, डायलेसिस, विषबाधा विभाग, हृदयविकार विभाग सुरू करून आपले काम सुरू ठेवले आहे. परंतु असे अनेक गंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.रुग्ण आणि नातेवाईकांना मनस्तापखेडेगावातून आलेल्या अनेक रुग्णांची सीपीआरमधील अन्य विभाग बंद केल्यानंतर गैरसोय झालीच. परंतु त्यांना मनस्तापही सहन करावा लागला. हे सर्वजण पहिल्यांदा सीपीआरमध्ये येत असत. तेथे अन्य विभाग बंद केल्यानंतर मग त्यांना लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाकडे जाण्यास सांगितले जाई. तेथे गेल्यानंतर तेथून संदर्भ चिठ्ठी घेऊन खासगी रुग्णालयाला पाठविले जाई. परंतु काही ठिकाणी दाखल करून घेताना विलंब होत असल्याने अनेकजण पुन्हा सीपीआरकडे येत होते.

टॅग्स :Deathमृत्यूCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर