२८ संस्था अवसायनात
By Admin | Updated: December 22, 2015 00:57 IST2015-12-22T00:28:37+5:302015-12-22T00:57:48+5:30
शाहूवाडी तालुक्यातील सहकारी संस्थांत खळबळ : नऊ बंद, चार कागदावरच

२८ संस्था अवसायनात
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील २८ सहकारी सेवा संस्था व पतसंस्था, औद्योगिक सहकारी संस्था शासनाच्या सहकार विभागाने अवसायनात काढल्या आहेत. त्यामुळे सहकारी सेवा संस्थांत खळबळ उडाली आहे. यातील नऊ संस्था कायमस्वरूपी बंदअवस्थेत आहेत, तर चार औद्योगिक संस्था कागदावरच आहेत.
शाहूवाडी तालुक्यात २११ सहकारी संस्था आहेत. शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा व्हावा, या उद्देशाने गावागावांत सहकारी सेवा सोसायट्या स्थापन झाल्या, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नाही यासाठी पतसंस्था, बहुउद्देशीय संस्थांची स्थापना करण्यात आली. मात्र, तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे सेवा संस्थांच्या कारभाराची घडी विस्कटली. त्यामुळे काही संस्थांचे बोर्ड नावालाच दिसू लागले आहेत. सहकार विभागाने या २८ संस्थांना अवसायनात काढण्याची नोटीस बजाविली आहे.
अवसायनात काढलेल्या संस्थांची नावे अशी : जयकिसान विकास सेवा संस्था मलकापूर, केदारलिंग सेवा संस्था शित्तूर-मलकापूर, परखंदळे विकास संस्था परखंदळे, उदय सहकारी पाणीपुरवठा संस्था सुपात्रे, गजानन विकास सेवा संस्था शित्तूर-वारूण, आदर्श विकास सेवा संस्था शित्तूर-वारूण, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था साळशी, निनाईदेवी स्वयंरोजगार सेवा संस्था परखंदळे, मानसिंगराव गायकवाड ग्रा. बि. शे. सहकारी संस्था सुपात्रे, हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्था चनवाड-शाहूवाडी, शिवशक्ती ग्रा. बि. शे. सहकारी पतसंस्था भाडळे, खुटाळवाडी सहकारी धान्य संस्था खुटाळवाडी, श्री दत्त स्वयंरोजगार कृषिपूरक उद्योग सहकारी संस्था शित्तूर-मलकापूर, डोणजाई विकास सेवा संस्था आंबर्डे, कालेश्वर विकास सेवा संस्था शिराळे मलकापूर, शिवभवानी ग्रा. बि. शेती सहकारी संस्था हारुगडेवाडी, भीमजी ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्था खुटाळवाडी, योगिराज ग्रा. बि. शेती पतसंस्था सरूड, हनुमान ग्रा. बि. शेती पतसंस्था ससेगाव, माउली ग्रा. बि. शेती पतसंस्था मालेवाडी, स्वशक्ती अपंग स्वयंरोजगार सेवा उद्योग संस्था वाडीचरण, शिवाई महिला मागासवर्गीय सहकारी निटिंग संस्था उचत, परिवर्तन मागासवर्गीय टेक्सटाईल्स संस्था उचत, आनंदराव मागासवर्गीय निटिंग संस्था उचत, शिवाई मागासवर्गीय सहकारी रवा-मैदा संस्था उचत, महात्मा फुले मागासवर्गीय नागरी पतसंस्था शाहूवाडी, महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था ससेगाव, श्री दत्त स्वयंरोजगार कृषिपूरक संस्था शित्तूर तर्फ मलकापूर. (प्रतिनिधी)
शाहूवाडी तालुक्यातील
२८ सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याची नोटीस बजाविली आहे. मुदत संपल्यानंतर या सर्व संस्थांवर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी त्यांची नोंदणी रद्द केली जाणार आहे.
- पी. व्ही. पोवार, सहायक निबंधक.