२८ दिवस ‘त्याचा’ पत्ताच नाही
By Admin | Updated: May 8, 2014 12:27 IST2014-05-08T12:27:34+5:302014-05-08T12:27:34+5:30
वडिलांनी केवळ रागावल्याने ‘कन्हैया’ने सोडले घर

२८ दिवस ‘त्याचा’ पत्ताच नाही
कोल्हापूर : रागाने काही बोलल्यास मुलं काहीही करू शकतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ‘कन्हैया’चे. १७ वर्षांचा असणारा कन्हैया बालमुकुंद पारीक याला ‘सकाळी लवकर ऊठ’, असे वडिलांनी बजावले, या रागातून त्याने एका क्षणात घर सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्याचे आई-वडील अक्षरश: त्याची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. कन्हैया बेपत्ता झाल्याची राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे, मात्र अद्याप यश आलेले नाही. कन्हैयाच्या वडिलांनी लांजा, गणपतीपुळे, पुणे, राष्ट्रीय महामार्ग येथे जाऊन शोधले. त्यात गणपतीपुळे येथे कन्हैया येऊन गेल्याचे एका व्यापार्याने सांगितले. मात्र, तो तेथून कोठे गेला हा प्रश्न गडद झाला आहे. रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, ५ फूट ९ इंच त्याची उंची असे त्याचे वर्णन आहे. तो कोणाला आढल्यास मो. ९०४९०२२११० यावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)