२७२ खेड्यांचा अन् ३६ वाड्यांचा समावेश

By Admin | Updated: October 5, 2014 23:30 IST2014-10-05T23:25:21+5:302014-10-05T23:30:29+5:30

गटा-तटाचेच राजकारण : राजकीय पक्षांचा प्रभाव कमी

Of the 272 villages, 36 are included | २७२ खेड्यांचा अन् ३६ वाड्यांचा समावेश

२७२ खेड्यांचा अन् ३६ वाड्यांचा समावेश

राम मगदूम-- गडहिंग्लज
जिल्ह्याच्या दक्षिणेकडील संपूर्ण ग्रामीण, डोंगरी व दुर्गम मतदारसंघ. पुनर्रचनेत संपूर्ण चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, महागाव, नूल व हलकर्णी आणि आजरा तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून हा नवीन मतदारसंघ तयार झाला आहे. हिटणीपासून पारगडपर्यंत आणि विटे-खानापूरपासून शिनोळीपर्यंत सुमारे १२५ ते १५० किलोमीटर इतका विस्तीर्ण मतदारसंघ आहे. यामध्ये तब्बल २७२ महसुली गावे आणि ३६ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे.
नव्या मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेब कुपेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर गोपाळराव पाटील आणि अपक्ष उमेदवार भरमू पाटील व नरसिंगराव पाटील, ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर, ‘रिडालोस’चे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे असा बहुरंगी सामना झाला. तरीही कुपेकरांनीच बाजी मारली. पत्नी संध्यादेवींनाही पोटनिवडणुकीत साथ मिळाली.
दोन दशके गडहिंग्लज उपविभागात स्व. कुपेकर यांचाच विशेष प्रभाव राहिला. गडहिंग्लजमध्ये स्व. कुपेकर, स्व. राजकुमार हत्तरकी, श्रीपतराव शिंदे, किसनराव कुराडे, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह नलवडे व राजेंद्र गड्यान्नावर यांचे गट तर चंदगडमध्ये नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, गोपाळराव पाटीलबरोबरच नितीन पाटील व संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांचे गट, तर आजऱ्यात जयवंतराव शिंपी, रवींद्र आपटे, विष्णूपंत केसरकर, अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, अंजना रेडेकर यांचे गट कार्यरत आहेत.स्व. कुपेकरांच्या पश्चात संध्यादेवीप्रमाणेच संग्रामसिंह कुपेकरांनीही गट करण्याचा प्रयत्न केला. नेसरी जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय ‘शाहू आघाडी’ कार्यरत आहे.

महाडिक, सतेज पाटील, विनय कोरे
गडहिंग्लज विभागात महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, सतेज पाटील, विनय कोरे यांना मानणारा मतदारदेखील या भागात आहे. त्यांचे स्वतंत्र गटही या विभागात कार्यरत आहेत.


अल्प भू-धारकांची संख्या
अल्पभू-धारक शेतकऱ्यांची संख्या या मतदारसंघात अधिक आहे. चित्री व फाटकवाडी या प्रकल्पासह लहान-मोठ्या तलावामुळे सिंचनक्षेत्रात वाढ झाली असली तरी पाण्याच्या लाभार्थ्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे शेतमजुरी व
पशुपालनावर गुजराण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

निकाल फिरवणारी गावे व तेथील मतदान
नूल - ५२७५, हलकर्णी - ४९३३, हसूरचंपू - ३२६२, महागाव- ६२१३, नेसरी ५३६९, भडगाव -६५४८, तेरणी- ३५४७, चंदगड - ७०६४, तुडिये - २८८६, माणगाव - ३७९५, कोवाड - २६७३, कुदनूर - ३१०४, कालकुंद्री - २७६१, तुर्केवाडी - २६१०


निर्णायक मते : लिंगायत व बेरड समाज
कळीचे मुद्दे  --वादग्रस्त एव्हीएच प्रकल्प आणि सलग चार वर्षे बंद पडलेला दौलत साखर कारखाना.
सत्तेची वाटणी  --गोकुळ संचालक - ३ संचालक - स्व. राजकुमार हत्तरकी (गडहिंग्लज), रवींद्र आपटे (आजरा) व दीपक पाटील (चंदगड) गडहिंग्लज साखर कारखाना - श्रीपतराव शिंदे गट - ७, प्रकाश चव्हाण गट - १५, - आजरा साखर कारखाना - राष्ट्रवादी - १४, काँगे्रस - ५, स्वाभिमानी - २, शिवसेना - १, --दौलत साखर कारखाना - गोपाळराव पाटील गटाची सत्ता
संध्यादेवी कुपेकर - जि.प.सदस्य ४, पं.स.सदस्य ९ --भरमूअण्णा पाटील- जि.प.सदस्य २, पं.स.सदस्य ३ -नरसिंगराव पाटील - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ३ --संग्राम कुपेकर - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ३
देसाई-शिरोलीकर - जि.प.सदस्य १, पं.स.सदस्य ० --गडहिंग्लज बाजार समिती : गटनिहाय संचालक असे - नरसिंगराव पाटील - २, बाबा कुपेकर - ५, गोपाळराव पाटील - २, राजकुमार हत्तरकी - २, सदाशिव मंडलिक - १, विक्रमसिंह घाटगे - १, श्रीपतराव शिंदे - १, प्रकाश चव्हाण - १, भरमू पाटील - १, जयवंत शिंपी - १, अशोक चराटी - १, रवींद्र आपटे - १,
मतदारसंघातील प्रश्न
दोन औद्योगिक वसाहत सुरूच नसल्याने येथे बेरोजगारीचा प्रश्न मोठा.
चंदगड तालुक्यातील गावजोड रस्ते व अंतगर्त रस्ते.
गडहिंग्लजच्या पूर्वभागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न.
पुनर्वसन रखडल्यामुळे आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे.
तेथील मतदान : नूल - ५२७५, हलकर्णी - ४९३३, हसूरचंपू - ३२६२, महागाव- ६२१३, नेसरी ५३६९, भडगाव -६५४८, तेरणी- ३५४७, चंदगड - ७०६४, तुडिये - २८८६, माणगाव - ३७९५, कोवाड - २६७३, कुदनूर - ३१०४, कालकुंद्री - २७६१, तुर्केवाडी - २६१०

चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतून पोटापाण्यासाठी गुजरात, मुंबई, पुणे व इचलकरंजीला गेलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. गिरणी कामगारांची संख्याही याठिकाणी मोठी आहे. प्रत्येक निवडणुकीत या चाकरमान्यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली असून, त्यांची गठ्ठा मते मिळविण्यासाठी नेहमीच चढाओढ असते.

Web Title: Of the 272 villages, 36 are included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.