शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात दहा गरोदर मातांसह २६७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:52 IST

जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीतील माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त ६९,४७० एचआयव्ही टेस्ट झाल्या. त्यापैकी २६७ जण पॉझिटिव्ह आहेत. याची टक्केवारी ०.४ इतकी आहे. यातील ३४३५६ गरोदर मातांची तपासणी केली, त्यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या.आईपासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग वेळेत घेतलेल्या औषधोपचारांमुळे ३८ बालकांपैकी एकाही बाळाला एचआयव्ही संसर्ग झाला नाही, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सेक्स वर्कर, स्थलांतरित कामगार या जोखीम गटातील व्यक्तींसह गरोदर महिला, क्षयरोगी यांच्या प्राधान्याने १०० टक्के एचआयव्ही तपासण्या कराव्यात. आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून एचआयव्ही तपासणी किटकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, एआरटी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लिंक्ड एआरटी सेंटर समुपदेशक, जिल्हा समुदाय संसाधन समिती सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन केंद्रांमार्फत सुरू असलेल्या इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये संवेदीकरण चालू असून, या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 267 HIV Positive, Including Ten Pregnant Women This Year

Web Summary : Kolhapur district reports 267 HIV-positive cases this year, including ten pregnant women out of 34,356 tested. Early treatment prevented HIV transmission to babies. Increased HIV testing is prioritized, with funds allocated if needed. Awareness campaigns are underway in schools and villages.