शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेला २६ हजार नव मतदारांवर गंडातर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 15, 2026 19:30 IST

२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदार

इंदुमती गणेशकोल्हापूर : एक जुलैनंतर नोंदणी केलेले जिल्ह्यातील २५ हजार ७३९ मतदार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाला मुकणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलैपर्यंत झालेली मतदार यादी या निवडणुकीसाठी पात्र ठरवल्याने नोंदणीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. १ जुलैनंतर तब्बल सहा महिन्यांनी निवडणूक होत असताना किमान ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणे अपेक्षित होते. एका बाजूला मतदान नोंदणीसाठी निवडणूक यंत्रणा सगळी ताकद लावतात आणि ज्यांनी मतदान नोंदणी केली त्यांना मात्र या हक्कापासून वंचित ठेवतात असा उफराटा अनुभव येत आहे. त्याबद्दल लोकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.आधी नगरपालिका, सध्या सुरू असलेली महापालिका आणि पुढील महिन्यात होत असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला किती तारखेपर्यंत झालेली मतदार नोंदणी ग्राह्य धरू शकतो याचे अधिकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही तारीख १ जुलै ठरवली. त्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी नगरपालिका निवडणूक झाली, सहा महिन्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी किमान ३ महिने आधीची मतदार यादी ग्राह्य धरणे अपेक्षित होते.

लोकसभा-विधानसभेला उमेदवारी अर्जापर्यंतलोकसभा विधानसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठ ते दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी सुरू होती. नंतर पुरवणी यादी जोडली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र १ जुलैनंतर कटऑफ मारला गेला आहे.

स्थानिक पातळीवर चुरस अधिकस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गावागावातील, तालुक्यांमधील राजकारणात टोकाची ईर्ष्या असते. एक एक मतासाठी उमेदवार झटतो कारण त्यावर निकाल फिरतात. दुसरीकडे प्रशासन मतदान वाढावे यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना इथे मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मतदार मतदान करू शकणार नाही.

तालुका : २ जुलै ते १२ जानेवारीपर्यंत झालेले मतदारतालुका : १८-१९ : २०-२९ : ३० वर्षावरील : एकूणशिरोळ : ५२९ : १८४१ : १०९० : ३४६०कोल्हापूर दक्षिण : २९८ : १४३८ : १४५४ : ३१९०इचलकरंजी : ३१९ : १७५५ : १११० : ३१८४हातकणंगले : ४०७ : १७८४ : ८५८ : ३०४९करवीर : ३८७ : १५७१ : ७५९ : २७१७चंदगड : २५२ : १३७६ : ९११ : २५३९शाहुवाडी : २६४ : १२२१ : ६५४ : २१३९राधानगरी : ३११ : ११७२ : ४९९ : १९८२कोल्हापूर उत्तर : १८२ : ८९७ : ७३२ : १८११कागल : २३० : ९३० : ५०८ : १६६८एकूण : ३ हजार १७९ : १३ हजार ९८५ : ८ हजार ५७५ : २५ हजार ७३९

शिरोळमध्ये सर्वाधिक मतदार१ जुलैनंतर झालेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक ३ हजार ४६० मतदार शिरोळमध्ये, त्यानंतर कोल्हापूर दक्षिणमध्ये ३ हजार १९० इचलकरंजीमध्ये ३ हजार १८४ मतदार आहेत.

२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदारनव्याने झालेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक १३ हजार ९८५ मतदार हे २० ते २९ वयोगटातील तर ३ हजार १७९ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. म्हणजेच मतदान करू न शकणाऱ्यांमध्ये नवमतदारांची संख्या अधिक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad Elections: 26,000 New Voters Face Disenfranchisement.

Web Summary : Over 25,000 Kolhapur voters registered after July 1st cannot vote in the Zilla Parishad elections. The State Election Commission's cutoff date is causing resentment as many, especially young voters, are being denied their right to vote despite registration efforts.