अशोकराव माने पॉलिटेक्निकच्या २५१ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:25+5:302021-08-20T04:28:25+5:30
यझीकी इंडिया, इस्लल प्रो पॅक, बजाज ऑटो, जॉन डिअर, थ्री एम इंडिया, केएसपीजीऑटो अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांत विद्यार्थ्यांची निवड ...

अशोकराव माने पॉलिटेक्निकच्या २५१ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी
यझीकी इंडिया, इस्लल प्रो पॅक, बजाज ऑटो, जॉन डिअर, थ्री एम इंडिया, केएसपीजीऑटो अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अभियांत्रिकीमधील गुणवत्तेचे एनबीए मानांकन कॉलेजने प्राप्त केलेले आहे. 'क्वालिटी एज्युकेशन क्वालिटी प्लेसमेंट' ही कृती साध्य होत असल्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी अग्रक्रम दिला जातो. तीन वर्षांत शिक्षण घेऊन उत्तम पगाराची नोकरी देण्यासाठी आम्ही प्लेसमेंट सेल अधिक भक्कमपणे कार्यरत ठेवला आहे, अशी माहिती प्राचार्य वाय. आर. गुरव यांनी दिली. यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अजय मस्के, प्रा. फिरोज अमीन उपस्थित होते.
फोटो ओळी-वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थिनीला अध्यक्ष विजयसिंह माने यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, सना अमीन, प्राचार्य पी. बी. घेवारी, प्रवीण हसबे, डॉ. अजय मस्के, फिरोज अमीन उपस्थित होते.